यावल शहरातील अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गाची दुरुस्ती

वाहन चालकांना दिलासा : खड्डे चुकवताना झाले अनेक अपघात


यावल (7 नोव्हेंबर 2024) : शहरातून मार्गस्थ होणार्‍या अंकलेश्वर बर्‍हाणपूर राज्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी वाहनधारकांकडून व नागरिकांकडून केली जात होती. या अनुषंगाने बुधवारपासून या रस्त्याच्या दुरुस्तीला सार्वजनिक बांधकाम विभाग, यावलमार्फत सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणे सुरू झाल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप
यावल शहरातून अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्ग मार्गस्थ होतो. या राज्य मार्गावर चोपडा नाक्यापासून ते थेट फैजपूर रस्त्याकडील महाविद्यालयापर्यंत मोठ-मोठे खड्डे पडलेले होते. यामुळे या रस्त्यावरून ये-जा करतांना वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता तर खड्डे चुकवत असतांना किरकोळ अपघातदेखील या ठिकाणी घडत होते. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी वाहनधारक आणि नागरिकांची होती. सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांच्या वतीने बुधवारपासून या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे. भुसावळ टी पॉईंटपासून या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली. रस्ता दुरुस्त होत असल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !