सावदा पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांचा रूट मार्च
सावदा (11 नोव्हेंबर 2024) : आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सावदा पोलीस ठाणे हद्दीतील सावदा शहरासह चिनावल गावात पोलिसांनी रूट मार्च करीत ग्रामस्थांच्या मनातील भीती दूर केली. मुक्ताईनगरचे पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा सहा.निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह दोन अधिकारी व 30 जवान तसेच सावदा पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी व 10 कर्मचार्यांच्या उपस्थितीत रूट मार्च काढण्यात आला.

