आमदार कसा हवा ? जनतेची कामे करणारा की संस्था सांभाळणारा ! : महायुतीचे उमेदवार अमोल जावळे

खिरोदा-रोझोदा परिसरात अमोल जावळेंच्या प्रचाराला प्रतिसाद


रावेर (11 नोव्हेंबर 2024) : भाजप शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी (अजितदादा गट) रीपाई (आठवले गट) महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांनी आज सोमवार, 11 रोजी रावेर तालुक्यातील खिरोदा, रोझोदा, कळमोदा, सावखेडा आदी.गावात प्रचार फेरी काढली. यावेळी जावळे यांना जनतेने विजयाचे आशीर्वाद दिले. गुजरात गोध्राचे आमदार देखील अमोल जावळे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहे.

राज्यातही महायुतीचे सरकार येणार : अमोल जावळे
मतदारांशी संवाद साधताना अमोल जावळे म्हणाले रावेर मतदारसंघ हा विकासाच्या संदर्भात खूपच मागे पडला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार असल्याने राज्यातही पुन्हा महायुती सरकार आवश्यक आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर केंद्राकडूनही विकासाला मोठा निधी प्राप्त होईल आणि मतदारसंघात विकासाची कामे होतील.

मतदार संघातील प्रत्येक घटकासाठी विकास कामे करण्याची आमची योजना तयार आहे. विजयी झाल्यानंतर विकास कामांची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत. विकास हा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे याची आम्ही काळजी घेणार आहोत तर विकासासोबतच हिंदुत्वाचे रक्षणही करणे ही देखील आमची जबाबदारी आहे. हिंदुत्वाची व्याख्या करताना केवळ एक घटक समोर न ठेवता सकल हिंदू समाज हा विचार समोर ठेऊन सर्वांचा विकास करणे याला आमचे प्राधान्य राहणार आहे. समाजातील बारा बलुतेदार हे देखील आमच्या सोबत आहेतच.

जनतेची कामे करणारा आमदार हवा की…!
आपल्या संस्था सांभाळण्यासाठी काही उमेदवार आमदार होण्याची स्वप्न पाहत आहेत पण मला जनतेची कामे आणि मतदारसंघाचा विकास करायचा आहे. जनतेसाठी मी पूर्णवेळ उपलब्ध राहणार आहे. आपली कामे करणारा आमदार हवा की केवळ आपल्या संस्थांची अनुदाने लाटणारा आमदार हवा हे ठरवण्याची आता आवश्यकता आणि वेळ आली असल्याचे उमेदवार अमोल जावळे म्हणाले.

यांचा प्रचारात सहभाग
भाजप पक्षश्रेष्ठींनी अमोल जावळे यांच्या प्रचारासाठी खास गुजरातमधील गोध्रा येथील आमदार पी.सी.बंडोले यांना मतदारसंघात पाठवले आहे. ते मतदारांची संपर्क साधत आहे. यावेळी सुरेश धनके, गोपाळ नेमाडे, चेतन पाटील, सारीकाताई चव्हाण, ठकसेन पाटील, डॉ.मिलिंद वायकोळे, भूषण राणे, वाय.डी.पाटील (शिवसेना), भगवान पाटील, सागर भारंबे, रोशन सरोदे यांच्यासोबत महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले.


कॉपी करू नका.