भुसावळातील ऑल इंडिया बॉक्सिंग अ‍ॅकेडमी टूर्नामेंटमध्ये महाराष्ट्रातील स्पर्धकांचे वर्चस्व


भुसावळ (12 नोव्हेंबर 2024) : कोरोनेशन क्लबमध्ये आयोजीत ऑल इंडिया बॉक्सिंग अ‍ॅकेडमी टूर्नामेंटमध्ये देशभरातील विविध राज्यातील आलेल्या खेळाडूंमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंचे अंतीम सामन्यात वर्चस्व राहिले. गेल्या पाच दिवसांपासून ही टूर्नामेंट येथे सुरू होती. या टूर्नामेंटचा रविवारी समारोप झाला. यशस्वी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

एमसी मेरी कॉम यांच्याहस्ते उद्घाटन
शहरातील कोरोनेशन क्लबमध्ये आई फाऊंडेशन अंतर्गत छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी आयोजीत राणी लक्ष्मीबाई मुली व महिलांसाठी ऑल इंडिया बॉक्सिंग टूर्नामेंटला गुरूवारपासून सुरूवात झाली होती. रविवारी फायनल स्पर्धा झाल्या. यानंतर पाच दिवसांपासून सुरू असलेल्या टूर्नामेंटचा समारोप झाला. या स्पर्धांचे उद्घाटन ऑलंम्पिक विश्व विजेता एमसी मेरी कॉम यांच्याहस्ते झाले. पहिल्या दिवशी मेरी कॉम यांची मिरवणूक काढून त्यांना स्धर्धेच्या ठिकाणी आणण्यात आले होते.

स्पर्धकांना बक्षीसाचे वितरण
शनिवारी व रविवारी येथे झालेल्या स्पर्धेत सेमी फायनल व फायनल स्पर्धा झाल्यात. यातील यशस्वी स्पर्धकांना रविवारी बक्षीस वितरण करण्यात आले. शनिवार, रविवार अशा दोन दिवस येथे अंतीम स्पर्धा झाल्यात. विविध राज्यातून आलेल्या स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. यात देशातील पंजाब, हरियाणा, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजराथ, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. शहरात प्रथमच महिला, मुलींसाठी ऑल इंडीया बॉक्सिंग टूर्नामेंट झाली. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या टूर्नामेंटमध्ये स्पर्धा प्रमुख अरुण बुटे (नागपूर), महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना महासचिव राकेश तिवारी (चंद्रपूर), छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी अध्यक्ष नरेंद्र (बाळा) मोरे, आई फाऊंडेशनचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष किरण पाटील, विशाल सपकाळे आदींनी

हे स्पर्धक झाले विजयी
गरीमासिंग (नागपूर), आलीया बारसे (अमरावती), पूनम जीविथा (आंध्रप्रदेश), कावेरी असरीथा (आंध्रप्रदेश), शुभरा रेवतकर (अमरावती), पूर्वा झांबरे (भुसावळ), सरापाला साई (आध्रप्रदेश), परिणिती तिवाई (पुणे), रिया शिंदे (सातारा), सृष्टी जमदाडे (छ. संभाजी नगर), संस्कृती टाले (भुसावळ), आदिती भानते (गडचिरोली), सई करांडे (पनवेल), अनन्या वैद्य (कोल्हापूर), रोकय्या शेख (परभणी), सिध्दा कांबळे, लावण्या पाटील, सायली काटे (कोल्हापूर), समृध्दी शिंदे (सातारा), अवनी काळे (परभणी), वैष्णवी पाते (कोल्हापूर), दिशा निमजे (नाशिक), कुंजन अंभोरे (बुलढाणा), स्लेशा बडगे (चंद्रपूर), फातिमा अहमद (परभणी), यशदा भोसले (सातारा), सानवी महाजन (भंडारा), प्रिशा पवार (मुंबई) हे विजयी झाले.

स्पर्धक घराकडे रवाना
गेल्या पाच दिवस सुरू असलेल्या या बॉक्सिंग स्पर्धांमध्ये 340 महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. देशभरातील विविध राज्यातून आलेले स्पर्धक रविवारी रात्री त्याच्या घराकडे परतले. गेल्या वर्षी हरियाणा येथे मिळालेल्या प्रतिसादाप्रमाणेच भुसावळ येथेही स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्या असे बॉक्सिंग संघटनेचे राज्य महासचिव डॉ.राकेश तिवारी यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !