भुसावळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

वाढदिवस जल्लोषात साजरा : सामाजिक कार्यासाठी उदंड आयुष्याच्या शुभकामना


भुसावळ : भुसावळातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा समाजसेवक व अष्टभूजा डेअरीचे संचालक नितीन धांडे यांचा मंगळवार, 16 रोजी वाढदिवस असल्याने दिवसभर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, सोशल मिडीयावरून त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अष्टभूजा गणेश मंडळातर्फे मध्यरात्री 12 वाजता भला मोठा केक कापून धांडे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.



या मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, माजी नगरसेवक संतोष बारसे, समाजसेवक देवा वाणी, स्वीकृत नगरसेवक प्रा.सुनील नेवे, गब्बर चावरीया, सनी गोने, मनीष पाचपांडे, धीरज चौधरी यासह कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मिडीयाद्वारे धांडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !