भुसावळात रीपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

माजी मंत्री एकनाथराव खडसेंसह मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा गरजू दिव्यांग बांधवांना सायकल वितरण


भुसावळ : रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजूभाऊ सूर्यवंशी यांचा रविवार, 16 जानेवारी रोजी वाढदिवस असल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हितचिंतक, स्नेहींनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून, मोबाईलवर तसेच सोशल मिडीयाद्वारे शुभेच्छा दिल्या. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत वरणगाव रोडवरील संभाजी नगरात दिव्यांग बांधवांना मान्यवरांच्या हस्ते सायकल वितरण करण्यात आले.

दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकलचे वितरण
भुसावळचे माजी नगरसेवक व रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी वरणगाव रोडवरील संभाजी नगरात आयोजित कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत तीनचाकी सायकल वितरण करण्यात आले.



यांची कार्यक्रमास उपस्थिती
संभाजी नगरात आयोजित कार्यक्रमास माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगरसेवक किरण कोलते, माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे, माजी नगरसेविका पूजाताई सूर्यवंशी, पुरूषोत्तम नारखेडे, पप्पू सुरडकर, दिनेश नेमाडे, रोहन सूर्यवंशी, शरद सोनवणे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

मान्यवरांकडून राजूभाऊ सूर्यवंशी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
तरुणांचे गळ्यातील ताईत असलेल्या रीपाइं जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांचा रविवारी वाढदिवस असल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांसह स्नेहीजणांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून तसेच सोशल मिडीया व मोबाईलवरून त्यांना शुभेच्छा दिल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !