मुक्ताईनगरात माजी मंत्री एकनाथ खडसेंना धक्का : महायुतीचे आमदार चंद्रकांत पाटील दुसर्‍यांदा विजयी

विजयानंतर महायुतीतील कार्यकर्त्यांचा जल्लोष : आमदारांवर फुलांची उधळण


Former Minister Eknath Khadse suffers a setback in Muktainagar : Mahayuti MLA Chandrakant Patil wins for the second time मुक्ताईनगर (23 नोव्हेंबर 2024) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या लढतील माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या गडाला दुसर्‍यांदा सुरूंग लावण्यात आमदार चंद्रकांत पाटील यशस्वी झाले. आमदार चंद्रकांत पाटील यांना एक लाख 12 हजार 318 तर प्रतिस्पर्धी अ‍ॅड.रोहिणी खडसे यांना 88 हजार 414 मते मिळाली. 23 हजार 904 मते मिळवून आमदार चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगरात विजयी झाले. विशेष म्हणजे गत 2019 च्या विधानसभेत अवघ्या एक हजार 957 मतांनी आमदार पाटील यांचा विजय झाला होता मात्र यावेळी त्यांनी लीड अधिक घेत खडसेंच्या बालेकिल्ल्यातील वर्चस्वाच्या बुरूजालाही धक्का दिला.

अपक्षांसह वंचितलाही मतदारांनी दाखवली जागा
मुक्ताईनगरात अपक्षांची भाऊगर्दी वाढली होती तर आमदार चंद्रकांत पाटील व अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्या नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारांना उभे करण्यात आले होते शिवाय वंचितनेही येथे उमेदवार दिला होता मात्र सुज्ञ मतदारांनी सर्वांनाच पराभवाचा धक्का दिला. राज्यातील सर्वाधिक चुरशीची लढत येथे असल्याने मुक्ताईनगरकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून आमदार एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व मुक्ताईनगरात असल्याने त्यांच्या वर्चस्वाला दुसर्‍यांदा सुरूंग लावण्यात आमदार चंद्रकांत पाटील येथे यशस्वी झाले आहेत.


उमेदवारांना मिळालेली मते अशी
आमदार चंद्रकांत पाटील (महायुती) 112318
अ‍ॅड.रोहिणी एकनाथराव खडसे (महाविकास आघाडी) 88414
संजय पंडित ब्राह्मणे (वंचित आघाडी) 5471
विनोद नामदेव सोनवणे (अपक्ष) 2332
उमाकांत आत्माराम मराठे (अपक्ष) 1643
अनिल गंभीर मोरे (बसपा) 664
अनिल बाबूराव गंगतिरे (अपक्ष) 972
अशोक बाबूराव जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया) 721
अर्जुन तुळशिराम पाटील (अपक्ष) 142
ईश्वर भागवत सपकाळ (अपक्ष) 128
रोहिणी कवले (अपक्ष) 120
रोहिणी खडसे (अपक्ष) 193
रोहिणीताई खडसे (अपक्ष) 583
चंद्रकांत पाटील (अपक्ष) 927
चंद्रकांतभाऊ पाटील (अपक्ष) 944
जाफर अली मकसूद अली (अपक्ष) 224
सुरेश रुपा तायडे (अपक्ष) 126







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !