भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात शेअर मार्केटच्या संदर्भात मार्गदर्शन


भुसावळ (2 डिसेंबर 2024) : भुसावळ  शहरातील के.नारखेडे विद्यालयात जीवनातील आर्थिक नियोजनाच्या संदर्भात शेअर मार्केट विषयी मंगल इन्व्हेस्टमेंट कंपनी भुसावळचे संचालक योगेश पाटील यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शेअर मार्केट संदर्भात व्याख्यान दिले. त्यांनी प्रामुख्याने नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तसेच एकूणच शेअर मार्केटमधील कंपन्यांचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य आणि विद्यार्थ्यांचे भविष्यातील या क्षेत्रातील योगदान या संदर्भातील महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.

सीप अर्थात सिस्टिमॅटिक इन्वेस्टेड प्लॅन या संदर्भात सुद्धा त्यांनी विस्तृतपणे विद्यार्थ्यांना माहिती दिली. योगेश पाटील यांचे परममित्र मध्य रेल्वे टेक्निशियन नरेंद्र कोटुरवार उपस्थित होते. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, विज्ञान शिक्षक नितीन पाटील, एस.एस.कापसे, स्वाती नेहेते, एस.व्ही.जावळे, विशाल राणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान शिक्षक बी.बी.जोगी यांनी केले. दहावीच्या विज्ञान पाठयपुस्तकातील फायनान्शिअल प्लॅनिंग या चॅप्टर संदर्भातील शेअर मार्केट या विषयावर विद्यार्थ्यांशी हितगुज केले. प्रमुख अतिथी योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. एस.पी.पाठक यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय दिला तर सूत्रसंचालन नेहा पाटील यांनी केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !