जळगावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; व्हिडिओ व्हायरलची धमकी देणार्या तरुणाला बेड्या
Minor girl molested in Jalgaon ; Youth arrested for threatening to make video viral जळगाव (8 डिसेंबर 2024) : माझ्यासोबत प्रेमसंबंध नाही ठेवले तर सोबत काढलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. हा प्रकार 4 डिसेंबरला घडला. याप्रकरणी कामेश उर्फ कमलेश विनोद चरखे (रा.विठ्ठल मंदिराजवळ, सुप्रिम कॉलनी) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.
असे आहे प्रकरण
शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 वर्षीय अल्पवयीन तरुणी वास्तव्यास आहे. 4 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास संशयित कामेश उर्फ कमलेश चरखे याने पीडीतेचा हात ओढत तू माझ्यासोबत प्रेमसंबंध नाही ठेवले तर मी तुझ्यासोबत काढलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेल., अशी धमकी दिली. यावेळी मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पीडीतेने तत्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयिताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहे.


