जळगावात पोलिसांच्या वाहनाला दुचाकी धडकली ; भावंडे जखमी


A bike hit a police vehicle in Jalgaon ; siblings injured जळगाव (8 डिसेंबर 2024) : पोलिसांचे बॅरिकेट्स घेऊन जाणार्‍या वाहनावर दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील दोघे भाऊ जखमी झाले. अपघाताची ?र्तीज्ञ घटना कलाभवन जवळ घडली. अपघातातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

असा घडला अपघात
शिरसोली नाक्यावरील सद्गुरू नगरातील ईश्वरसिंग मिहेरसिंग टाक (35) व त्यांचा भाऊ नेपालसिंद मिहेरसिंग टाक (36) हे दोघे भाऊ दुचाकीने जात असतांना त्यांची दुचाकी बॅरिकेट्स घेवून जाणार्‍या पोलिसांच्या वाहनावर धडकली. यामुळे या अपघातात दोघांनाही मार लागल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. यातील ईश्वरसिंग यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !