भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात खो-खो खेळासंदर्भात जाणीव जागृती
भुसावळ (9 डिसेंबर 2024) : शहरातील के.नारखेडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये खो-खो या खेळा संदर्भात जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी रविवार, 8 डिसेंबर 2024 रोजी विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या खो-खो च्या मॅच घेण्यात आल्या. यामध्ये मुलांचे इयत्ता दहावी अ ते दहावी फ पर्यंतचे संघांनी सहभाग नोंदविला.
अंतीम सामना इयत्ता दहावी ब व दहावी फ यांच्यात झाला. दोन्ही संघांतील खेळाडूंनी अतिशय उत्तम खेळल्यामुळे सामना अनिर्णित राहिला. या खो-खोच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे यांच्याहस्ते करण्यात आले. पंच एन.पी.नेहेते, नवीन नेमाडे यांनी भूमिका पार पाडली. समालोचक म्हणून शैलेंद्र वासकर, शैलेंद्र महाजन, स्कोरर एन.जे.खाचणे यांनी महत्वाची भूमिका बजावली. यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले.


