खंडोबा मंदिरात चंपाषष्टी महोत्सवात भक्तांचा जनसागर उसळला
.फैजपूर (9 डिसेंबर 2024) : चंपाषष्टी महोत्सवानिमित्त प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणार्या कुलदैवत श्री खंडोबा मंदिरात जागृत श्री खंडोबा भगवान, म्हाळसाई, बाणाई देवीचा षोडोपचार, महाअभिषेक व नैवेद्य, महाआरती मोठ्या धार्मिक जल्लोषात करण्यात आली. पौरोहित्य पूजारी रामनोहर दासजी महाराज, उत्तराधिकारी पवन दासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उन्मेष दीक्षित यांनी केले. यावल, रावेरसह जिल्हाभरातील भाविक मोठ्या संख्येने खंडोबाचरणी नतमस्तक झाले. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
महिला वर्ग उपस्थित
शनिवारी सकाळी 11 ते 3 पर्यंत स्वामी समर्थ सेवेकरी परिवाराच्या विद्यमाने सामूहिक मल्हारी सप्तशतीचा पाठ व मल्हारी याग करण्यात आला. याग हवनसाठी यजमान जोडपे म्हणून भुणेश्वर वायकोले, वायकोले, संजय सराफ, तनुजा सराफ, कोलते अप्पा यांनी सामूहिक पठण सेवा घेतली. स्वामी समर्थ सेवेकरी व महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला. खंडोबा मंदिर, फैजपूर येथे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सामूहिक मल्हारी सप्तशदीची सेवा करण्याचे आयोजन करण्याची घोषणा कोलते यांनी केले. सेवेकरी व खंडोबा भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन पवनदासजी महाराजांनी केले.

रक्तदान शिबिराला प्रतिसाद
याप्रसंगी संजीवनी रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबिर झाले. मंदिराचे उत्तराधिकारी यांनी स्वतः रक्तदानात सहभाग घेतला. एकूण 35 बाटली रक्त संकलन करण्यात आले. गुरुकुलचे संस्थाध्यक्ष स.गु.शास्त्री भक्ती प्रकाशदासजी, कोशिंदा गुरुकुलचे शास्त्री भक्ती स्वरूपदासजी महाराज, दीपक भगत, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकी पाटील, एनएसयुआय प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, कृषी सभापती राकेश फेगडे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.मिलिंद वायकोले आदी उपस्थित होते.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
जितेंद्र ओमप्रकाश वर्मा, रवींद्र सरोदे, पप्पू सरोदे, चंद्रकांत भिरूड, चोलदास पाटील, अनुराधा परदेशी, वर्मा, जयस्वाल, धनराज नारखेडे, बाळू नारखेडे, धीरज सोनवणे, चेतन वारके, मोहसीन भोळे, इच्छाराम चौधरी, पंडित राणे, यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

