पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे लेवा पाटीदार समाजाला प्रथमच केंद्रात मंत्रीपद

भुसावळात आमदार एकनाथराव खडसे : लेवा समाजातर्फे गुणवंताचा गौरव


Thanks to Prime Minister Narendra Modi, the Patidar community has been given a ministerial post at the Centre for the first time भुसावळ (9 डिसेंबर 2024) : लेवा पाटीदार समाजाला प्रथमच केंद्रात मंत्रीपद मिळाले असून खासदार रक्षा खडसे यांनी त्याच्या जीवनात अनेक संघर्ष केला आहे. त्यांच्या जीवनात अनेक चढ-उतार आहे. समाजबांधवांनी त्यांच्या पाठीशी राहून त्यांना विजयी केले व केंद्रात त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे मंत्री पद मिळाले, असे विचार भुसावळातील आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. शहरातील संतोषी माता सभागृहात रविवार, 8 डिसेंबर रोजी सकाळा 11 वाजता गुणवंतांच्या गौरव सोहळ्यासह वधू-वर परिचय मेळाव्यात ते बोलत होते. श्री सदगुरू झेंडूजी महाराज (बेळीकर) लेवा पादीदार समाज संस्थेतर्फे कार्यक्रम झाला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी भोरगाव लेवा पंचायतीचे कुटूंबनायक ललितकुमार पाटील होते. माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, महालक्ष्मी मंदीर ट्रस्टचे सल्लागार सुधीर पाटील, लेवा पाटीदार पंचमढी ट्रस्ट अध्यक्ष वासूदेव इंगळे, रजनी सावकारे, रमाकांत भारंबे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. नेपाळ अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रसंगी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

मान्यवरांच्या हस्ते सूचीचे प्रकाशन
लेवा पाटीदार समाज संस्थेचे अध्यक्ष दिनेश भंगाळे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची माहिती दिली. आमदार एकनाथ खडसे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वधू-वर परिचय सूचीचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन संध्या वराडे यांनी केले. राज्यभरातील समाजबांधव उपस्थिती होते. प्रसंगी इच्छूक वधू-वरांनी परिचय दिला तर काहींनी ऑनलाईन परिचय दिला.

केंद्रात लेवा समाजाचे प्रतिनिधीत्व : आमदार खडसे
आमदार खडसे म्हणाले की, लेवा पाटीदार समाजाला प्रथमच केंद्रात मंत्रीपद मिळाले असून रक्षा खडसे खासदार झाल्यानंतर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री केले. वारकरी सांप्रदायाचा वारसा लेवा पाटीदार समाजाला मिळाला असून समाजासाठी प्रत्येकाने काम करावे, असेही खडसे म्हणाले.

समाजाच्या नेहमीच पाठीशी : मंत्री रक्षा खडसे
प्रत्येक क्षेत्रात आपला समाजबांधव पोहोचला असून अगदी सिने व नाट्यक्षेत्रातही अक्षय ढाके पोहोचला आहे. भविष्यात समाजाची जी काही कामे असतील, अडचणी असतील तर त्या सोडविल्या जातील, अशी ग्वाही सत्काराला उत्तर देताना मंत्री रक्षा खडसे यांनी दिली. त्या म्हणाल्या की, लेवा समाजात विभक्त होण्याचे प्रकार वाढले आहे, हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा. आमदार एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे, स्व.बाळासाहेब चौधरी, स्व. हरिभाऊ जावळे आदी समाज बांधवांनी समाजाच्या विकासासाठी कामे केली. समाजाची साथ असल्याशिवाय मोठे होता येत नाही, लेवा पादीदार समाजाला वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभल्याचे ते म्हणाले.

आमदारांच्या विजयात लेवा समाजाचा मोठा वाटा
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत लेवा पाटीदार समाज मोठ्या प्रमाणावर सोबत राहिल्याने आमदार संजय सावकारे यांचा विजय झाला. कार्यक्रमाला आल्यानंतर एकीकडे आमदार खडसे तर दुसरीकडे मंत्री रक्षा खडसे होत्या व मध्ये सावकारे होते त्यामुळे काहीसे दडपण आले, असे त्या म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !