भुसावळच्या आमदारांची कॅबिनेटपदी वर्णी : भाजपा कार्यकर्त्यांनी महामानवास केले वंदन


Bhusawal MLAs inducted into cabinet : BJP workers pay homage to the great man भुसावळ (16 डिसेंबर 2024) : भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांची नागपूर मंत्री मंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर भुसावळात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भुसावळातील भाजपा कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन केले. यावेळी जळगाव पूर्व जिल्हा चिटणीस खुशाल जोशी व अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी श्री फाउंडेशन अध्यक्ष सारंगधर पाटील, युवा मोर्चा खजिनदार मनिष पाटील, प्रवीण इखणकर, रमाशंकर दुबे, चेतन सावकारे, रुपेश देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, रवींद्र दाभाडे, संतोष ठोकळ, प्रेमचंद तायडे, गणेश मिस्त्री, चेतन जैन, गोपीसिंग राजपूत, अमित असोदेकर, यशांक पाटील, चंदन पाटील, श्याम गोरधे, भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.


कॉपी करू नका.