जळगावातील पाईप लाईन चोरी प्रकरण : 1 जानेवारी रोजी कामकाज
Pipeline theft case in Jalgaon: Proceedings on January 1 जळगाव (27 डिसेंबर 2024) : तत्कालीन नगरपरिषदेच्या गिरणा पंपीग येथून शहरासाठी असलेल्या जुनी पाईप लाईन चोरी व विक्री प्रकरणी दाखल गुन्ह्यात जास्तीचा वस्तु पुरावा मिळवायचा असल्याने मुदत मिळावी, असा अर्ज तपासाधिकार्यांनी गुरुवार, 26 रोजी न्यायालयात सादर केला. त्यानुसार न्यायालयाने मुदत देत जामीन अर्जासाठी पुढील वर्षी म्हणजे 1 जानेवारी रोजी कामकाज होईल.
1 जानेवारीला कामकाज
पाईप लाईन चोरी व साहित्याची भंगारात विक्री प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील संशयित तथा विरोधीपक्ष नेता सुनील महाजन यांच्यातर्फे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन सादर केला आहे. या अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार होती. त्यानुसार तपासाधिकारी संजय गायकवाड हे न्या.एस.एल. राजुरकर यांच्या न्यायालयात हजर झाले. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र जी काबरा उपस्थित होते. तपासाधिकार्यांनी अर्ज सादर करुन मुदत मागितली. त्यात त्यांनी म्हटले, या गुन्ह्यातील पूर्वीचे तपासाधिकारी यांची बदली झाली आहे.
या गुन्ह्यात जास्तीचा वस्तु पुरावा प्राप्त करावयाचा आहे. तसेच गुन्ह्याची व्याप्तीचा अभ्यास व तपासाला वेळ मिळावी,यासाठी वेळ मिळावा, अशी विनंती त्यांनी केली. न्यायालयाने तपासाधिकार्यांचे म्हणणे ग्राह्य धरत या अर्जावरील सुनावणीचे कामकाजाला मुदत वाढवून देत पुढील सुनावणी 1 जानेवारी रोजी होईल,असे जाहीर केले.


