भुसावळातील आतीश खरात चाकू हल्लाप्रकरणी एकाविरोधात गुन्हा


Case filed against one in connection with the knife attack on Aatish Kharat in Bhusawal भुसावळ (29 डिसेंबर 2024) : शहरातील समता नगरातील रहिवासी आतीश खरातवर जुन्या वादातून मित्र असलेला संशयीत आरोपी सम्राट सुरेश बनसोडे (भुसावळ) यानेच चाकू हल्ला केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी संशयीताविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलिसात गुन्हा
शहरातील समता नगरात शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास आतीश रवींद्र खरात याच्यावर सम्राट बनसोडे याने चाकू हल्ला केल्याने आतीश जखमी झाला होता. तयच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतीश व सम्राट यांच्यात जुना वाद असल्याने त्यासाठी मित्र विवेक गायकवाडने मध्यस्थी करून वाद मिटावा, अशी भूमिका घेतली. शुक्रवारी रात्री आतीश खरात व सम्राट बनसोडे यांची भेट झाली. आतीश, विवेक व सम्राट हे तिन्ही एकत्र आले त्याच वेळी सम्राट बनसोडे याने आतीतशवर चाकू हल्ला केल्याने तो जखमी झाला असून हॉस्पीटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी आतीश रवींद्र खरात याने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात सम्राट सुरेश बनसोडे याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !