भाजपातर्फे 5 रोजी सदस्य नोंदणीचा मेगा ड्राइव्ह : जिल्हाध्यक्ष अमोल जावळे


BJP to hold mega drive for member registration on 5th : District President Amol Javale भुसावळ (3 जानेवारी 2025) : भाजपाचे संपूर्ण महाराष्ट्रभर सदस्यता नोंदणी अभियान सुरू झाले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा पूर्वमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात व मंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यात सर्व संघटन पर्व अभियानांतर्गत सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्हा पूर्वमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी सदस्यता नोंदणी अभियान कशा पद्धतीने राबवायचे यासाठी जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांची कार्यशाळा भुसावळ येथील स्टार लॉन येथे घेण्यात आली. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर देखील कार्यशाळा येत्या तीन दिवसांमध्ये करून पूर्ण करायचे आहे. अशा सूचना जिल्हाध्यक्ष आमदार अमोल जावळे यांनी केल्या.

यांची होती उपस्थिती
या कार्यशाळेला जळगाव जिल्ह्यातील मंत्री संजय सावकारे, जिल्हा प्रभारी म्हणून आमदार चैनसुख संचेती, डॉ.राजेंद्र फडके, अभियाासह संयोजक डॉ. राधेश्याम चौधरी, लोकसभा निवडणूक प्रमुख नंदूभाऊ महाजन, प्रदेश सचिव अजय भोळे, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, परीक्षीत बर्‍हाटे, वैशाली कुलकर्णी, आतीष झाल्टे, हरलाल कोळी, त्याचबरोबर जिल्हा पदाधिकारी व मंडळाचे पदाधिकारी या कार्यशाळेला उपस्थित असल्याची माहिती जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी यांनी दिली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !