व्हिडिओ व्हायरलची धमकी देत मुलीवर अत्याचार
गैरकृत्याला मदत करणारे तिघे मित्र अडकले पोक्सोत
Girl tortured, threatening to make video viral जळगाव (28 जानेवारी 2025) : सतरा वर्षीय मुलीशी ओळख करुन मैत्री केली. त्यानंतर तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध केले. हा व्हिडिओसह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला मध्यप्रदेशात पळवून नेले. वारंवार तिचे जबरीने शारिरीक शोषण केले. हा खळबळजनक प्रकार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. या गैरकृत्यात संशयिताला मदत करणारे त्याचे तीन मित्र कायद्याच्या कचाट्यात आले असुन संशयित मुख्य आरोपीसह या त्रिकुटावर 25 रोजी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला.
काय घडले नेमके
14 जानेवारी 2024 ते 20 जानेवारी 2025 या दरम्यान संशयित नितेश धनराज राठोड याने पीडित मुलीला मैत्री करण्याचा बहाना करत शिरसोली जंगलात तसेच मध्यप्रदेशातील इंदोर येथे नेले. याठिकाणी त्याने तिच्यावर जबरी संबंध केले. संशयिताने या मुलीचे एकटीचा तसेच त्याचे सोबत अश्लील फोटो व व्हिडीओ काढला.हा व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि आई वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देत तिच्यावर त्याने वारंवार अत्याचार केला. पीडितेने ही सारी कैफियत पोलीस ठाण्यात मांडली.पोनि संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांनी प्रत्यक्ष पीडितेची भेट घेतली.


मुलीला पळवून नेण्याच्या कृत्यात संशयिताच्या कृत्याला मदत करणारे त्याचे मित्र गोविंद रामसिंग राठोड, ज्ञानेश्वर भावलाल चव्हाण,गोरख थानसिंग चव्हाण तसेच मुख्य संशयित नितेश राठोड यांच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहेत.





