राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयांना मिळाली मंजुरी


मुंबई (11 फेब्रुवारी 2025) : राज्य मंत्री मंडळाची बैठक मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात तीन मोठे निर्णय संमत झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

या निर्णयांना संमती


1) देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्प, ता. विक्रमगड, जि. पालघरसाठी 2599.15 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी
प्रकल्पातून 69.42 दलघमी पाणीसाठा वसई-विरार महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित
(जलसंपदा विभाग)

2) जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना ता. दौंड, बारामती आणि पुरंदर जि. पुणे योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रुपांतरण करण्याच्या कामासाठी विस्तार व सुधारणा अंतर्गत 438.48 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता
– जनाईतून दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागात 8350 हेक्टरला सिंचन
– शिरसाईतून बारामती, पुरंदरच्या अवर्षण भागात 5730 हेक्टरला सिंचन
(जलसंपदा विभाग)

3) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांत 2019 मध्ये दुरुस्ती
(मदत व पुनर्वसन विभाग)

दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांत 2019 मध्ये दुरुस्ती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याने एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये घेण्याचा मार्ग मोकळा झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !