अर्थसंकल्पापूर्वीच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…!
मुंबई (2 मार्च 2025) : सरकारचे चार आठवड्यांच्या अधिवेशनाला सोमवार, 3 मार्चपासून सुरूवात होत असून पूर्वसंध्येला विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार नोंदवला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराबद्दल सांगितले की, विरोधकांनी चहापान या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला मात्र त्यांच्यासाठी ही संधी होती. संवाद स्थापीत करण्याची संधी होती. या संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज रणजी ट्रॉफी आपल्या राज्यात आणली यासाठी मी विदर्भ टीमचे अभिनंदन करतो. नवीन सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे.

दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, 8 मार्चला अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच महिला दिनाचे औचित्य साधून चर्चा केली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, रोज काहीतरी स्थगिती दिल्याचे कानावर येते आणि मी तर अशी स्थगिती दिलेलीच नसते. कोणी आरोप केला तर तपास करावा अशा सूचना आम्ही देतो. कुठल्याही वेळेस कारवाई तसेच स्थगिती द्यायची असेल तर दुसरी बाजू तपासल्याशिवय आपण निर्णय देत नसतो. तसेच शिवरायांचा अपमान करणार्यांवर सरकार कारवाई करणार, असे अश्वासन देखिल फडणवीसांनी दिले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. आमदारांची संख्या कमी पण पत्र भले मोठे पाठवले. विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही एवढे काम जनतेने केले आहे. अजित पवार अर्थसंकल्प पुन्हा मांडतील. लोकांनी आमच्या कामाची पोचपावती दिली आहे. विकास प्रकल्पांना आम्ही चालना दिली. मुंबईतील अनेक प्रकल्प आपण पाहिले असे अनेक प्रकल्प आपण पुढे नेले आहेत. जलयुक्त शिवार यिजनासारखे अनेक प्रकल्प महविकास आघाडीने बंद केले होते. मी मुख्यमंत्री झाल्यावर ते पुन्हा सुरू केले होते. कल्याणकारी योजना आपण आणल्या आहेत. लाडकी बहिण योजना आहे. हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. या राज्याला पुढे नेण्याचा आमचा अजेंडा आहे. या अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळेल व या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेतले जातील.
सत्ताधारी आणि विरोधक हे दोन चाके आहेत. मी एवढेच सांगेल ज्या बातम्या मुद्दाम पेरल्या जातात यात ज्याचा संबंध नसतो त्याचेही नाव जोडले जाते. विरोधक खोट्या बातम्या पेरत असतात. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. तुम्ही विश्वासार्हता जपली पाहिजे. आमच्यात कोल्ड वार अजिबात नाही. आमचा अजेंडा सत्तेसाठी नाही, जनतेसाठी आहे. त्यामुळे थोडी शहानिशा करून बातम्या दिल्या गेल्या पाहिजे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
