भुसावळातील मुस्लीम भागात वेळेवर पाणीपुरवठ्यासह पथदिव्यांसह शौचालयाची समस्या सोडवा
भुसावळात मुस्लीम मंचचे मुख्याधिकार्यांना निवेदन
भुसावळ (3 मार्च 2025) : पवित्र रमजान महिन्याला सुरूवात झाली असून महिनाभर बांधवांचे उपवास असल्याने मुस्लीम बहुल भागात वेळेवर पाणीपुरवठा करावा, बंद असलेले पथदिवे सुरू करावेत तसेच शौचालयाची समस्या सोडवावी, अशी मागणी मुस्लीम मंचतर्फे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
अस्वच्छतेने आरोग्य धोक्यात
मुस्लीम वस्तीत अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागातील रजा टॉवर चौक, शालिमार हॉटेल चौक, अमरदीप टॉकीज चोक, खडका चौक, मुस्लीम कब्रस्थान भागातील पथदिवे बंद असल्याने तातडीने पालिका प्रशासनाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रमजान महिन्याचे पावित्र्य राखून समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

निवेदन देताना हाजी सलीम पिंजारी, साबीर मेंबर, सिकंदर खान, मेंबर जुनैद खान, मेंबर बशीर ठेकेदार, अकबर गवली व मुस्लीम बांधव उपस्थित होते.






