भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान दिवस उत्साहात


भुसावळ (3 मार्च 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डॉ.सी.व्ही.रमण यांची जयंती विज्ञान दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन प्रिन्सिपल नीना कटलर यांनी केले.

वैज्ञानिक विषयक मार्गदर्शन निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यानंतर विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी पाचवी ते आठवीचे विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर, व्हाईस प्रिन्सिपल मनप्रीत कौर, श्रद्धाली घुले, सोनाली मुजुमदार, कय्युम शेख यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !