भुसावळात शेतकर्‍यांच्या प्रश्नी काँग्रेसचे धरणे आंदोलन

तहसीलसमोर निदर्शने : विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन


भुसावळ (4 मार्च 2025) : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी., सोयाबीन, कापूस, तुर, हरभरा या पिकांची खरेदी करावी, शेतकर्‍यांना लागणारे खते, बी-बियाणे, कीटकनाशके व अवजारे यांना जीएसटी मुक्त करावे तसेच विधानसभा निवडणुकीत शेतकर्‍यांना दिलेल्या आश्वासनांची सत्ताधार्‍यांनी पूर्तता करावी या मागणीसाठी भुसावळ शहर काँग्रेस कमेटीने सोमवारी तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

या मागण्यांसाठी आंदोलन
शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही, शेतकर्‍यांच्या घरात शेतातील माल आला की सरकार त्या मालाची पदेशातून आयात करते यामुळे सरकारच शेतकर्‍यांचे भाव पाडते. त्यात कापूस, तूर, सोयाबीन, मका अशा अनेक पिकांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यात भर म्हणजे खते, बी-बियाणे, शेती अवजानरे यांच्यासह 18 टक्यांपर्यंत कर लागतो यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे. शेतकरी कर्जबाजारीपणा व नैराश्यातून आत्महत्या करतात. राज्यातील सत्ताधार्‍यांनी निवडणुकीत शेतकर्‍यांना अनेक आश्वासने दिली होती मात्र एकही आश्वासने पाळले गेले नाही. यासर्व प्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी घरेलू कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू डोंगरदिवे, सरचिटणीस संतोष साळवे, शहर सचिव रामअवतार परदेशी, हमीद शेख, सूनील दांडगे, अमोल पाटील आदी उपस्थित होते.



मंत्री संजय सावकारेंनी राजीनामा द्यावा
स्वारगेट बसस्थानकामध्ये झालेल्या युवतीच्या अत्याचार प्रकरणी मंत्री संजय सावकारे यांनी बेताल वक्तव्य केले. ‘अशा घटना घडतच राहतात’ अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली. यापूर्वीही त्यांनी शासकीय बैठकीत अधिकार्‍यांचा बाप काढला होता. यामुळे मंत्री सावकारे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम यांनी केली.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !