कुशल शासक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटावर उद्या भुसावळ शहरात ‘नाटीका‘
भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजन
भुसावळ (8 मार्च 2025) : कुशल शासक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रतिष्ठा महिला महिला मंडळ यांच्या माध्यमातून रविवार, 9 रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारीत नाटीकेचे सादरीकरण होणार आहे.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसादख पोलीस अधीक्षक डॅ.महेश्वर रेड्डी, डीआरएम ईती पाण्डेय, भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

शहरवासीयांना उपस्थितीचे आवाहन
शहरातील वांजोळा रस्त्यावरील स्टॉर लॉनमध्ये रविवार, 9 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नाटीकेचे सादरीकरण स्थानिक कलावंतांच्या माध्यमातून होणार आहे. याच कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा सन्मानही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
अहिल्यादेवी या एक कुशल शासक होत्या. त्यांची निष्पक्षता आणि उत्कृष्ट प्रशासनाची उदाहरणे आजही मार्गदर्शक आहेत. इतिहासात त्यांच्या पराक्रमाचा अवीट ठसा उमटलेला असून भारतात हिंदू मंदिरांसह तीर्थस्थळांच्या जीर्णोद्धारासह अन्नछळ, घाट, धर्मशाळा, विहिरीत उभारण्यात मोलाचे योगदान असल्याने कार्य आजच्या पिढीसमोर येण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी दिली.
अहिल्यादेवी होळकर यांचा गौरवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी भुसावळ शहर व तालुक्यातील विद्यार्थी, तरुण, महिला, पुरूषांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे तसेच सर्व सदस्यांनी केले आहे.
