वरणगावातील पाणीप्रश्न सोडवण्याचे आदेश : जलशक्तीमंत्री सी.आर.पाटील
वरणगाव (9 मार्च 2025) : जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील हे मुक्ताईनगर जात असताना त्यांचे वरणगाव शहरातील महात्मा फुले सर्कलवर जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री सी.आर.पाटील व खासदार स्मिता वाघ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. वरणगाव रेल्वे स्थानकावर कोरोनो काळापूर्वी ज्या रेल्वे एक्सप्रेस गाड्या थांबत होत्या त्यांना पूर्ववत थांबा द्यावा, भोगावती नदीचे सुशोभीकरण करून त्यात ओझरखेडा धरणाचे पाणी सोडावे, मंजूर पाणीपुरवठा योजनेत तापी नदी पात्रात जॅकवेलसह साईनगर प्रतिभा नगर विकास कॉलनी येथे नव्याने टाक्या मंजूर कराव्यात, पाणीपुरवठा योजनेच्या कामाला जलद गती देण्याची मागणी करण्यात आली. जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी रेल्वे गाड्यांना थांबा देण्या संदर्भात मी तातडीने रेल्वेमंत्र्यांशी बोलतो तसेच वरणगावचा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.
यांची होती उपस्थिती
नवीन जॅकवेल व पाण्याच्या टाक्याच्या बाबतीत सुद्धा सकारात्मक निर्णय घेण्यास केंद्र सरकारला सुचवण्यात येईल तसेच भोगावती नदीचे सुशोभीकरण करून ओझरखेडा धरणाचा पाणी सोडण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी दिली.

प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपाचे अध्यक्ष सुनील माळी, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, कामगार नेते मिलिंद मेढे, तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, आकाश निमकर, मिलिंद भैसे, हाजी अल्लाउद्दीन शेठ, अॅड.ए.जी.जंजाळे, बळीराम दादा सोनवणे, अरुण इंगळे, नंदू जोशी, अरुण बावणे, सुभाष महाजन, भास्कर गवळी, किरण धुंधे, कला व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष योगेश माळी, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी, पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष मयूर शेळके, डॉ.नाना चांदणे, कृष्णा महाजन, गोविंदा गावंडे, मुन्ना माळी, मुस्लीम अन्सारी, शेख फजल, जिल्हा सरचिटणीस डॉ.सादीक शेख, कृष्णा सोनगीरकर, संदीप माळी, राहुल जंजाळे, सोनू भंगाळे, संतोष पाटील, संतोष नारखेडे, अनिल काळे, बापू माळी आदींची उपस्थिती होती.
