स्त्री शक्तीचा गौरव वाढवण्यासाठी प्रयत्नशील व्हा : भुसावळात समुपदेशक आरती चौधरी
भुसावळ (9 मार्च 2025) : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिवस दिवसानिमित्त एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी अध्यक्षस्थानी होते. वक्ता म्हणून प्रसिद्ध समुपदेशक आरती चौधरी होत्या.
महिला समाजाच्या आधारस्तंभ
डॉ.रमेश जोशी म्हणाले की, महिला या समाजाच्या आधारस्तंभ आहेत. त्यांचे मोठे योगदान आहेत. महिलांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी.

अन्यायाविरुद्ध वाचा फोडलीच पाहिजे
समुपदेशक आरती चौधरी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांना सर्व क्षेत्रात काम करताना समानतेची व सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे. महिलांनी स्वावलंबी व्हावे, आत्म सन्मानाने जगावे स्त्री शक्तीचा गौरव वाढवण्यासाठी सर्वांनी सदैव प्रयत्नशील रहावे. समाजात महिलांवर होणार्या अन्यायामुळे महिलाना पीडा सहन करावी लागते. याबाबत महिलांनी सावध रहावे अन्यायाविरुद्ध वाचा फोडलीच पाहिजे.
याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपल्या शंकेचे समाधान करण्यासाठी प्रश्न विचारले व मुलींची वेगळी बैठक घेऊन कौन्सलिंगद्वारे आरती चौधरी यांनी त्यांच्या सर्व प्रश्नांचे समाधान केले. आभार प्रा.ज्योती ओस्तवाल यांनी मानले. यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाचे प्रा.अनुपम शर्मा व प्रा.ज्योती ओस्तवाल, डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी, प्रा.शिबा खान, प्रा.समता तायडे आदींनी परिश्रम घेतले.






