170 मृतदेहांचा स्वखर्चाने अंत्यसंस्कार : भुसावळातील कंत्राटदार योगेश पाटील यांचा सन्मान
भुसावळ (10 मार्च 2025) : शहरातील शासकीय कंत्राटदार योगेश वासुदेव पाटील यांनी गेल्या तीन वर्षांपासून बेवारस निराधार मृतदेहाची भुसावळ तालुक्यातील तीनही पोलीस स्टेशनच्या सहकार्याने आतापर्यंत सुमारे 170 मृतदेहांवर स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले आहेत शिवाय काही तरुणांच्या सहकार्याने स्वखर्चाने गोसेवा केल्याने या कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित सेवा भारती जळगाव, देवगिरी प्रांत या संस्थेतर्फे त्यांचा समारंभ पूर्वक सत्कार करण्यात आला.
योगेश पाटील यांचा ज्येष्ठ विधीत्ज्ञ अॅड.नारायण लाठी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताचे संघटनमंत्री पराग कंगले यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी सेवाभारती जिल्हाध्यक्ष मनीष काबरा, जिल्हा सचिव सेवा भारती संदीप कासार यांची विशेष उपस्थिती होती.

