भुसावळ पालिका दवाखान्यात सर्वोतोपरी सुविधा पुरवाव्यात : निळे निशाणची संघटनेची मागणी
भुसावळ (10 मार्च 2025) : भुसावळ नगरपालिकेच्या दवाखान्यात सर्वोतोपरी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी निळे निशाण संघटनेतर्फे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे करण्यात आली. निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने भुसावळ तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या समस्यांचे निवेदन प्रांतधिकारी यांना देण्यात आले.
या मागण्यांचा समावेश
पालिका रुग्णालयात गर्भवती महिलांची प्रसुतीदरम्यान शस्त्रक्रिया सीझर करण्याची व्यवस्था करावी, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यान्वीत करण्यात यावी, रक्त पेढी सुरू करण्यात यावी, भुसावळ शहरात नाहाटा कॉलेज, आठवडे बाजार, बसस्थानक, यावल नाका या परिसरात तात्काळ महिलांकरिता स्वच्छतागृह उभारावे, भुसावळ शहरात डी.एस.विद्यालय प्रांगणाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले असलेतरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक लावण्यात आलेला नसल्याने 31 मार्चपर्यंत फलक लावावा, पालिका दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांची तत्काळ बदली करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

निवेदन देताना निळे निशाण सामाजिक संघटनेचे जळगाव जिल्हाप्रमुख नंदा भावटे, जिल्हा कार्याध्यक्ष अॅड.प्रवीण इंगळे, जिल्हा उपाध्यक्षा ज्योती पवार, शिक्षण व रोजगार जिल्हा अध्यक्षा निकिता भावटे, शिक्षण व रोजगार समिती जिल्हा उपाध्यक्षा मनिषा लोखंडे, भुसावळ तालुकाध्यक्षा निर्मला सुरवाडे, भुसावळ शहराध्यक्षा वंदना चव्हाण, विभागीय अध्यक्षा लक्ष्मी मेढे व इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
