भुसावळ रेल्वे विभागात महिलांनी चालवली गुडस् ट्रेन

भुसावळ (10 मार्च 2025)  : भुसावळ विभागामध्ये जागतिक महिला दिवस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. भुसावळ रेल्वे स्थानकावरून खंडवा दिशेने एक विशेष गुड्स ट्रेन पूर्णतः महिला कर्मचार्‍यांच्या संचालनाखाली रवाना करण्यात आली. या विशेष गुड्स ट्रेनचे नेतृत्व महिला लोको पायलट ज्योती सिंग, सहायक लोको पायलट शिवानी, गुड्स ट्रेन मॅनेजर भाग्यश्री पिंपळे यांनी केले. या विशेष गुड्स गाडीला मंडळ रेल्वे प्रबंधक इती पाण्डेय यांनी हिरवा झेंडा दाखवूला.

महिला तिकीट तपासणीचे कार्य कौतुकास्पद
मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय यांनी भुसावळ स्टेशनवरील टीटीई लॉबीमध्ये महिला टिकीट तपासणी कर्मचार्‍यांशी संवाद साधला आणि त्यांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले. अहमदाबाद ते बरोनी एक्सप्रेस या रेल्वेगाडीत भुसावळ ते इटारसी दरम्यान संपूर्ण टिकट तपासणी कार्य महिला कर्मचार्‍यांच्या विशेष टीमने पार पाडले. या संपूर्ण उपक्रमामुळे महिला सशक्तीकरणाचा सकारात्मक संदेश देण्यात आला. कृष्णचंद्र सभागृहात मंडळ रेल्वे प्रबंधक इती पाण्डेय यांच्या उपस्थितीत महिला कर्मचार्‍यांसाठी विविध स्पर्धा पार पडलया. त्यात रांगोळी, नृत्य, गीतगायन, समूह नृत्य स्पर्धा आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा समावेश होता. वरिष्ठ चिकित्सा अधिकारी डॉ.विनीला यांनी उपस्थित मार्गदर्शन केले. भुसावळ नियंत्रक कार्यालयातील ‘पिंक रेल मदतद कक्ष’ येथे मंडळ रेल्वे प्रबंधकांनी महिला कर्मचार्‍यांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अपर मंडळ रेल प्रबंधक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अपर मंडळ रेल प्रबंधक (तांत्रिक) मुकेश कुमार मीना, सर्व शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.

भुसावळ विभागामध्ये जागतिक महिला दिवस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. भुसावळ रेल्वे स्थानकावरून खंडवा दिशेने एक विशेष गुड्स ट्रेन पूर्णतः महिला कर्मचार्‍यांच्या संचालनाखाली रवाना करण्यात आली. या विशेष गुड्स ट्रेनचे नेतृत्व महिला लोको पायलट ज्योती सिंग, सहायक लोको पायलट शिवानी, गुड्स ट्रेन मॅनेजर भाग्यश्री पिंपळे यांनी केले. या विशेष गुड्स गाडीला मंडळ रेल्वे प्रबंधक इती पाण्डेय यांनी हिरवा झेंडा दाखवूला.

महिला तिकीट तपासणीचे कार्य कौतुकास्पद
मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय यांनी भुसावळ स्टेशनवरील टीटीई लॉबीमध्ये महिला टिकीट तपासणी कर्मचार्‍यांशी संवाद साधला आणि त्यांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले. अहमदाबाद ते बरोनी एक्सप्रेस या रेल्वेगाडीत भुसावळ ते इटारसी दरम्यान संपूर्ण टिकट तपासणी कार्य महिला कर्मचार्‍यांच्या विशेष टीमने पार पाडले. या संपूर्ण उपक्रमामुळे महिला सशक्तीकरणाचा सकारात्मक संदेश देण्यात आला. कृष्णचंद्र सभागृहात मंडळ रेल्वे प्रबंधक इती पाण्डेय यांच्या उपस्थितीत महिला कर्मचार्‍यांसाठी विविध स्पर्धा पार पडलया. त्यात रांगोळी, नृत्य, गीतगायन, समूह नृत्य स्पर्धा आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा समावेश होता. वरिष्ठ चिकित्सा अधिकारी डॉ.विनीला यांनी उपस्थित मार्गदर्शन केले. भुसावळ नियंत्रक कार्यालयातील ‘पिंक रेल मदतद कक्ष’ येथे मंडळ रेल्वे प्रबंधकांनी महिला कर्मचार्‍यांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अपर मंडळ रेल प्रबंधक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अपर मंडळ रेल प्रबंधक (तांत्रिक) मुकेश कुमार मीना, सर्व शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.

मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !