यावल तालुक्यातील डिझेल चोरट्याला एमआयडीसी पोलिसांकडून बेड्या


जळगाव (22 मार्च 2025) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी डिझेल चोरट्याला अटक केली आहे. सचिन दगडु ठाकुर (डांभुर्णी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असणा-या जड वाहनाच्या इंधन टाकीतून आरोपीने डीझेल चोरी केल्याने ही कारवाई करण्यात आली.

जळगाव शहरातील दिक्षीतवाडी येथील रहिवासी अभिषेक तिवारी यांनी या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या चारचाकी ट्रक मधून डिझेल चोरीच्या घटना वाढल्या होत्या.


अटकेतील सचिन ठाकुर याच्या ताब्यातील चोरीचे 9 हजार 200 रुपये किमतीचे शंभर लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, हवालदार गणेश शिरसाळे, पोलिस नाईक योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे, नितीन ठाकुर, किरण पाटील, राहुल घेटे आदींनी ही कारवाई केली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !