चाळीसगावनजीक घाटात भीषण अपघात : पिकअप उलटून तिघे ठार


Terrible accident at a ghat near Chalisgaon : Three killed as pickup overturns चाळीसगाव (3 एप्रिल 2025) : शहराजवळील कन्नड घाटाजवळ भरधाव पिकअप चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून झालेल्या अपघातात तिघे ठार झलो तर 17 जण जखमी झाले. हा भीषण अपघात बुधवार, 2 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे नवसाचा कार्यक्रम आटोपून येताना दुर्दैवी घटना घडली.

काय घडले नेमके?
चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा गावातील महाजन कुटूंबी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे जावळाच्या कार्यक्रमासाठी पिकअप (क्रमांक एम.एच.19 बी.एन.1947) ने गेले होते व परतीचा प्रवास सुरू असताना चाळीसगावजवळील घाटाच्या पायथ्याशी चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्याकडेला नाल्यात उलटले. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले.


तीन जणांचा मृत्यू, चौघे गंभीर
या भीषण अपघातात नाना दामू माळी (58, रा.पातोंडा), राहुल लक्ष्मण महाजन (35, रा. गुढे), सावित्रीबाई मधुकर माळी (65, रा.पातोडा) यांचा मृत्यू ओढवला तर 17 जण जखमी झाले. त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींमध्ये निंबा काळू महाजन (70 रा.पोहोरे), संदीप संपत माळी (38, पहाण), अनिकेत रमेश माळी (16, रा.पातोडा), सुनीता रमेश माळी (26 रा. पातोडा) हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले. इतर जखमी चाळीसगाव येथे उपचार घेत आहेत. याकरणी पिकअप चालक गोपीचंद निंबा माळीविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !