दबावापोटी वरणगावकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या आड आल्यास 12 रोजी रस्ता जाम करणार
माजी नगराध्यक्षांचा इशारा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे तक्रार
वरणगाव (8 एप्रिल 2025) : वरणगाव शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेची पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन ही अंजनसोंडा पुलाखालून नेली असून ही पाईप लाईन काढण्यात यावी यासाठी नहींचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांनी. नगरपरिषदेस नोटीस दिली आहे. टाकलेली पिण्याची पाईप लाईन काढल्यास शनिवार, 12 एप्रिल रोजी महामार्ग जाम करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद व प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांना माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला आहे.
नहीचे दबावातून काम
‘नहीं’ने दबांगिरी करू नये शिवाय शहराला 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने वरणगावकर आधीच त्रस्त आहेत. ‘नही’ने दाबावापोटी पाईपलाईन काढू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली. शेतकरी त्यांच्या शेतातून पाईप-लाईन टाकू देत नाहीत व 2021 ला नहीं ने याच पुलाखालून पाईप-लाईन टाकून दिली. मात्र आता नवीन योजनेची टाकलेली पाईप-लाईन कोणाच्या दबावातून काढण्यात येत आहेत याबाबत माहिती द्यावी, असेही काळे यांनी नहींच्या प्रकल्प संचालकांना ठणकावून सांगितले.

यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनाही तक्रार देण्यात आली. नहींने भूमिका न बदलल्यास शनिवार, 12 रोजी महामार्ग रोको करण्यात येईल, असा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे, मिलिंद भैसे, नाना चौधरी, कृष्णा महाजन यांनी दिला आहे.
