भुसावळ शहरात रविवारी टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी


Tennis ball cricket  भुसावळ (10 एप्रिल 2025) : महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नागपूर येथे 14 व 17 वर्षा आतील वयोगटातील सब-ज्युनिअर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे. यासाठी जळगाव जिल्हा मुले/मुलींचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार, 13 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता सेंट्रल रेल्वे स्कूल, रेल्वे हॉस्पिटलच्या पुढे, भुसावळ येथे होणार आहे.

24 ते 26 एप्रिलदरम्यान होणार स्पर्धा
राज्यस्तरीय स्पर्धा नागपूर येथे 24 ते 26 एप्रिल दरम्यान होणार आहे. निवडलेले विद्यार्थी जळगाव जिल्हा संघाकरिता सेंट मेरी स्कूलच्या ग्राउंड, नागपूर येथे प्रतिनिधित्व करतील. ज्या मुलांची जन्मतारीख 30 एप्रिल 2011 असेल ते विद्यार्थी 14 वर्षा आतील वयोगटासाठी व ज्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख 30 एप्रिल 2008 नंतरची असेल ते विद्यार्थी 17 वर्षातील वयोगटाच्या निवड चाचणीसाठी पात्र असतील. इच्छुकांनी सोबत आधार कार्ड व जन्म दाखला आणावा तसेच निवड चाचणीसाठी क्रिकेट गणवेशात यावे. अधिक माहितीसाठी जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे जिल्हा सचिव वासेफ पटेल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !