वरणगावात खडसेंच्या अश्लील वक्तव्याचा भाजपाकडून तीव्र निषेध


BJP strongly condemns Khadse’s obscene statement in Varangaon वरणगाव (11 एप्रिल 2025) : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नसताना आमदार एकनाथ खडसे यांनी अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरल्याच्या निषेधार्थ वरणगाव भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. तिरंगा सर्कल चौकात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेरावर यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले.

हा तर प्रमिा मलीन करण्याचा प्रयत्न
भाजपाने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार खडसे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत खालच्या स्तराचे आहे. त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. ही कृती अत्यंत निंदनीय आहे. त्यांनी त्वरित जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे. खडसे यांची भाषा ही राजकीय सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी आहे.


यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन, मिलिंद भैसे, नाना चौधरी, शामराव धनगर, सुनील माळी, मिलिंद मेढे, आनंद जंजाळे, डॉ.नाना चांदणे, मुस्लीम अन्सारी, अंकुश साबळे, राहुल जंजाळे, फजल शेख, तुकाराम कोळी, आकाश निमकर, योगेश माळी, राहुल वंजारी, मोहन भोई, कदील हाजी, बळीराम सोनवणे आदी सहभागी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !