मुलांच्या जडण-घडणीत आईचे स्थान महत्त्वाचे : आरती चौधरी


थोरगव्हाण (18 एप्रिल 2025) : आई हिच मुलांची पहिली गुरू असते. तिच्या सान्निध्यात संस्कार रुजतात. घरातील वातावरण व आईचे विचार मुलांच्या शालेय यशात मोठी भूमिका बजावतात. आईच्या सेवेचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. आईच्या न्यायालयात बाळाचे लेकरांचे सर्व गुन्हे माफ होतात, असे विचार भुसावळातील समुपदेशक आरती चौधरी यांनी येथे व्यक्त केले. गावातील डी.एस.देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुरू असलेल्या उन्हाळी संस्कारमाला शिबिराच्या पाचव्या पुष्पात त्या बोलत होत्या

‘मुलांच्या शालेय जडण-घडणीत आईचे स्थान’ या विषयावर बोलताना आरती सारंग चौधरी म्हणाल्या की, आईचे म्हणणे ऐका, म्हणणे टाळू नका, मोठे व्हा. राजमाता जिजाऊ यांनी आदर्श शिवरायांना घडवले कसे घडवले हे त्यांनी उदाहरणासह सांगितले शिवाय मातृहृदयी सानेगुरूची आईच्या संस्कारामुळे कसे घडले याबाबतची कथा ऐकताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. अध्यक्षस्थानी गातेचे माजी सरपंच सदाशीव बालकराम झांबरे होते. यावेळी आईचा महिमा व्यक्त करतांना सदाशिव झांबरे यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक डी.के.पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये गाते सरपंच सरीता गणेश पाटील, आर्किटेक्ट सारंग व्ही.चौधरी व गणेश पाटील यांची उपस्थिती होती. वक्त्यांचा परिचय जे.पी.चौधरी यांनी करून दिला. संस्थथाध्यक्ष चंद्रकांत चौधरी व संचालक रवींद्र काशीनाथ चौधरी यांची उपस्थिती होती. आभार प्रभारी मुख्याध्यापक डी.के.पाटील यांनी मानले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !