वरणगाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी जनतेला मिळण्यासाठी तातडीने भार वाढवा : जिल्हाधिकार्यांकडे मागणी
भुसावळ (18 एप्रिल 2025) : वरणगावातील 25 कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी फिल्टर प्लांटपर्यंत येऊन पोहोचले आहे. हे पाणी वरणगावकरांच्या दारात पोहचवण्यासाठी जॅकवेल वर वाढीव वीज भार तातडीने मंजूर करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जळगावचे जिल्हाधिकारी डॉ.आयुष कुमार प्रसाद यांच्याकडे केली. योजनेचे पाणी फिल्टर प्लांटपर्यंत आल्याने ते आता जनतेच्या दारापर्यंत येण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी काळे यांनी करीत वरणगावकरांना 15 दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत असून ते आता चार दिवसांना मिळणार आहे मात्र त्यासाठी वीज भार वाढवावा, अशी मागणी त्यांनी चर्चेदरम्यान केली.
यावेळी उपनगराध्यक्ष शेख अखलाख, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, कामगार नेते मिलिंद मेढे, शामराव धनगर, आकाश निमकर, मिलिंद भैसे, नाना चौधरी, पप्पू ठाकरे, बळीराम सोनवणे, योगेश माळी, नंदू जोशी, रमेश पालवे, डॉ.नाना चांदणे, अनिल वंजारी, भगवान वंजारी, अॅड.ए.जी.जंजाळे, मयूर शेळके, संदीप माळी, गोलू राणे, साबीर कुरेशी, गजानन वंजारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

