उधना-बरौनी दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या
Additional weekly summer special trains between Udhna-Barauni भुसावळ (19 एप्रिल 2025) : उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी पाहता उधना ते बरौनी दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
उधना ते बरौनी साप्ताहिक विशेष गाडीच्या 22 फेर्या होतील. गाडी क्रमांक 09037 विशेष गाडी 20 एप्रिल ते 29 जूनदरम्यान दर रविवारी 5.45 वाजता उधना येथून सुटेल आणि सोमवारी रोजी बरौनी येथे तीन वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 09038 विशेष गाडी 21 एप्रिल ते 30 जून 2025 पर्यंत दर सोमवारी सायंकाळी 6.30 वाजता बरौनी येथून सुटेल आणि बुधवार रोजी उधना येथे चार वाजता वाजता पोहोचेल. या गाडभला चलथान, बारडोली, नंदुरबार, अमळनेर, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दिन द्याल उपाध्याय जंकशन, बक्सर, आरा, दानापूर, पटना, बख्तियारपुर जंक्शन आणि मोकामा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
