बोराळे येथे अखंड हरीनाम संकीर्तन : भागवत कथेला प्रारंभ


यावल (20 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील बोराळे गावात शुक्रवारपासून मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा व रामजन्म उत्सवानिमित्ताने संगीतमय श्रीमद भागवत कथा व अखंड हरीनाम संकीर्तन सोहळ्यास प्रारंभ झाला. या सप्ताहाची सांगता 25 एप्रिल रोजी होणार आहे. या दिवशी महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.

दररोज विविध कार्यक्रम
बोराळे गावात मिती चैत्र शु, 5 शुक्रवार, 18 एप्रिलपासून अखंड हरीनाम संकीर्तन, भागवत कथेला प्रारंभ झाला. प्रमुख उपस्थितांमध्ये नागराज महाराज यांची उपस्थिती आहे तर पहाटे पाच ते सहा काकडा आरती व हरिपाठ, दुपारी दोन ते पाच श्रीमद भागवत कथा पारायण व रात्री 8 ते 10 संकीर्तनचे नियोजन करण्यात आले आहे. वाचक ह.भ.प. पुंडलिक महाराज चिखलकर तथा कथा गायनाचारी ह.भ.प.श्रीराम पाटील महाराज (बेंदुरा), ह.भ.प.विजय महाराज (माटरगाव), मृदुंगाचार्य व तबलाचार्य ह.भ.प गणेश महाराज (विटाळीकर), विणेकरी ह.भ.प काशीनाथ महाराज (साकळी), ह.भ.प.प्रकाश महाराज (मनवेल) आहेत. 21 एप्रिलला ह.भ.प. संजय महाराज मोहराळेकर, 22 एप्रिलला ह.भ.प. योगेश महाराज चिंचोलीकर, 23 एप्रिलला ह.भ.प. महेश महाराज एकलग्नकर, 24 एप्रिलला ह.भ.प.रितेश महाराज मलकापूर यांचे कीर्तन होईल. सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत गावातून दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 25 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 11 ह.भ.प. पुंडलिक महाराज चिखली यांचे काल्याचे कीर्तन होईल. 25 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 5 वाजे पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


या सप्ताहात गावातील राकेशशिंग परदेशी, शरद चौधरी, प्रमोदशिंग राजपूत, बलराजशिंग राजपूत, संजूशिंग राजपूत, दिलीप तेकडे, उमेशशिंग राजपूत, मुरलीधर पाटील, सुवागसिंग राजपूत, मयूर चौधरी, मनोज चौधरी, राजेंद्र पाटील, संजय चौधरी, सुधाकर चौधरी या भाविकांनी भोजनाची व्यवस्था सात दिवस केली आहे. कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन बोराळे, चुंचाळे भक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !