पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठांना लुटणारा भामट्याला बेड्या


A thief who robbed senior citizens by pretending to be a police officer is handcuffed पुणे (20 एप्रिल 2025) : स्वतःला पोलीस म्हणवून अनेक ज्येष्ठांची फसवणूक करणार्‍या भामट्याला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट सहाने अटक केली आहे. हमीद अफसर खान (30) असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्त्यावरील पठारे वस्तीचा रहिवासी आहे.

पोलिसांच्या तपासात आरोपीने पुणे शहर आणि परिसरात केलेले आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. पर्वती, कोथरूड, कोंढवा, सिंहगड रस्ता, भारती विद्यापीठ आणि सासवड परिसरात त्याने लुटमारीचे गुन्हे केले होते. आरोपीकडून सात लाख 68 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. एकूण मुद्देमालाची किंमत आठ लाख 68 हजार रुपये आहे.





गुन्हे शाखेच्या पथकाला स्मशानभूमीजवळ आरोपी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस कर्मचारी नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांनी सापळा रचून त्याला पकडले. चौकशीदरम्यान आरोपीने आणि त्याच्या साथीदाराने गुन्ह्यांची कबुली दिली.

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, नितीन घाडगे, शेखर काटे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती नरवडे यांनी ही कामगिरी केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !