डोलारखेड्याच्या जंगलात भूकबळीने बिबट्याचा मृत्यू ?

शवविच्छेदन अहवालाअंती मृत्यूचे कारण होणार स्पष्ट


Did a leopard die of starvation in the Dolarkheda forest? भुसावळ (22 एप्रिल 2025) : पट्टेदार वाघांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या ‘मुक्ताई-भवानी अभयारण्या’तील डोलारखेडा वनपरीमंडळातील उत्तर डोलारखेडा कं.नं. 573 मध्ये नर जातीचा बिबट्या वनविभागााला गस्तीदरम्यान रविवारी रात्री उशिरा मृतावस्थेत आढळला. भूकबळीने या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

शवविच्छेदनाअंती समोर येणार कारण
प्राथमिक अंदाजानुसार बिबट्याचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाला असल्याचा अंदाज आहे मात्र शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण समोर येणार आहे. रविवारी रात्री गस्तीदरम्यान झुडूपातून दुर्गंधी येत असल्याने खातरजमा केली असता तीन ते चार वर्षीय नर बिबट्या मृतावस्थेत आढळला. मृत बिबट्याची कातडी, नखे व सुळे शाबीत असल्याने भूकबळीने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

यांची होती उपस्थिती
वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.यश सागर, मुक्ताईनगर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी रामदास जाधव, डॉ.स्वागती करमांगे, डॉ.चव्हाण यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. उपवनसरंक्षक प्रवीण ए यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवनसरंक्षक उमेश बिराजदार, वनपरीक्षेत्र अधिकारी परीमल साळुंखे यांच्यासह वनपाल व प्रख्यात शुटर गणेश गवळी, वनरक्षक जी.बी.गोसावी, वनरक्षक रणजीत यांनी मयत बिबट्यावर सोपस्कार पार पाडले. मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई, वनसमिती अध्यक्ष विनोद थाटे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !