खून का बदला खून : वडिलांच्या हत्येनंतर मुलाने घेतला बदला : धरणगाव हादरले

वडिलांच्या खुनानंतर बदलासत्र : आरोपी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात


A young man from Wakatuki was shot dead near Dharangaon धरणगाव (22 एप्रिल 2025) : धरणगाव तालुक्यातील सोनवदजवळील विहिर फाटा येथे पूर्व वैमनस्यातून तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. गोपाल सोमा मालचे (वाकटुकी, ता.धरणगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून संशयीत आरोपी राहुल सावंत कोळी यास धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याच्या कारणातून ही हत्या झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आरोपी राहुल याच्या वडिलांचा 2010 मध्ये खून झाला होता मात्र या खून खटल्यात गोपाल मालचे याची निर्दोष मुक्तता झाली.

आरोपीने गोपाल मालचे याचा मंगळवारी पाठलाग केला व कार अडवल्यानंतर डोक्याच्या मध्यभागी गोळी झाडल्याने गोपाल मालचे यांचा मृत्यू झाला. खुनानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.

धरणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक पवन देसले यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !