पहलगाम हल्ल्याचा बोदवडला शहर बंद ठेवत निषेध


Bodwadla city shuts down to protest Pahalgam attack बोदवड (27 एप्रिल 2025) :  जम्मू काश्मिरातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले. या हल्ल्याचा बोदवड शहरातील व्यापारी व नागरिकांनी निषेध नोंदवत व्यापारीपेठ बंद ठेवली. औषध दुकाने व दवाखाने या अत्यावश्यक सेवाच केवळ सुरू होत्या. यावेळी तहसील प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले.

शहरातील गांधी चौकातून विविध संघटन, पक्ष पदाधिकारी यांनी एकत्र येत मोर्चा काढला. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात सिंधू नदी जल बंद, अटारी बॉर्डर बंद, समजोता रेल्वे बंद, भारतात पाकिस्तानी नागरीकांना व्हिसा बंद या केद्र सरकारच्या सर्व निर्णयाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष आनंदा पाटील, राष्ट्रीय सेवा संघाचे हरीओमजी जैस्वाल, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल देशमुख, शिवसेनेचे नेते डॉ.उध्दव पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद धामोडे, काँग्रेसचे बाळू पाटील यांच्यासह हजारो नागरीकांच्या निवेदनावर सह्या आहेत. निवेदनाची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, रक्षामंत्री व मानव अधिकार आयोग यांच्याकडे पाठवण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !