भुसावळातील साामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांची भोरगाव लेवा पंचायतीच्या उपाध्यक्षपदी निवड
Social activist Shishir Javale भुसावळ (27 एप्रिल 2025) : भोरगाव लेवा पंचायत भुसावळ विभागाची कार्यकारणी नुकतीच भुसावळ विभाग अध्यक्ष सुहास चौधरी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. बैठकीत भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते, लेवा हितवादी चळवळीचे प्रणेते तथा भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे सचिव शिशिर दिनकर जावळे यांची भोर गाव लेवा पंचायतीच्या भुसावळ विभागाचे युवा उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
याप्रसंगी भोरगाव लेवा पंचायत भुसावळचे सचिव सुभाष भंगाळे, प्रा.धीरज पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या संस्थेमध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढावा या उद्देशाने भोरगाव लेवा पंचायतीतर्फे प्रथमच भुसावळ विभागात युवकांची कार्यकारणी निवड करण्यात आली. याप्रसंगी गाव तिथे शाखा स्थापन करण्याचा निर्धार कार्यकारणी निवड बैठकीवेळी घेण्यात आला.


