भरधाव ट्रक-बोलेरो अपघातात चौघे जागीच ठार
Four killed in speeding truck-Bolero accident भंडारा (28 एप्रिल 2025) : भरधाव ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. भंडारा महामार्गावरील बेला येथील साईप्रसाद हॉटेल समोर रविवारी रात्री ही हा अपघात घडला.
अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रूग्णालयात दाखल केले, तर मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे.




रायपूरकडून आलेलं बोलेरो वाहन हे नागपूरकडं जात होते. यात 5 जण प्रवास करीत होते. बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादमध्ये हे सर्व जेवण करण्यासाठी महामार्गावरून वळत असताना नागपूरकडून भरधाव आलेल्या ट्रकवर आदळले. यात चौघांचा मृत्यू झाला. तर, चालक गंभीर जखमी आहे. अशोक फुलचंद डेहरवाल, शैलेंद्र लेखाराम बघेले, शैलेश पन्नालाल गोकुळपुरे, मुकेश बिंजेवार या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अविनाश नाकतोडे जखमी आहे.
घटनेची माहिती मिळतात भंडारा पोलिस आणि गडेगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. अपघातग्रस्त वाहनांना महामार्गावरून हटवून वाहतूक पूर्ववत सुरू केली.