बी.के.कुशवाहा परिवाराने लावले अस्थी व रक्षा विसर्जनातून स्मृतीचे वृक्ष
पर्यावरण जागर व टिम हिरवांकुरचे नाना पाटील यांनी केले मार्गदर्शन
Nana Patil of Pyaaryaan Jagar and Team Hirvankur guided भुसावळ (4 मे 2025) : शिरपूर कन्हाळा रोड के मार्ट समोरील रहिवासी स्व.श्रीराम कुशवाहा यांचे नुकतेच निधन झाले. यावेळी त्याचा मुलगा इंजिनिअर गोपाल भाई कुशवाह व त्यांच्या परिवाराने वडीलाचे अंतिम संस्कार पर्यावरण पुरक गोमातेच्या शेणापासून बनविलेल्या गोवर्यानी केला त्यांनतर अस्थी व रक्षा नदीत न टाकता जमिनीत गाडून त्यावर वड पिंपळ चिंच निंब असे पाच झाडे अमरधाम परिसरात लावली.
अस्थी व रक्षा जमिनीत गाडल्याने जलप्रदुषण वाचले. या जागेवर वृक्ष लावल्याने वृक्षाचे संगोपण संवर्धन केले जाईल त्यामुळे त्यांच्या स्मृति वृक्षाच्या निमित्ताने कायम राहतील . व जमिनीतही कमी होत असलेला कॅल्शियम जमिनीला मिळून वृक्षाना अधिक परिपक्व करेल . यासाठी आम्ही हा उपक्रम केला . यासाठी आम्हाला पर्यावरण जागर, टिम हिरवांकुर , पर्यावरण प्रेमी नाना पाटील सर यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले


प्रजापिता ब्रहमाकुमारी भुसावळ सेवाकेंद्राच्या ब्र कु कविता बहन यांनी कुशवाह परिवारातर्फे अस्थि व रक्षा विसर्जनातून स्मृति चे वृक्ष उपक्रम उपयुक्त असून हा उपक्रम समाजानेही करावा जेणेकरून वृक्ष सर्वधन होतील.
नाना पाटील सर यांनी गोपाल भाई कुशवाह व त्यांचा परिवाराचे हा उपक्रम राबवून समाजात आदर्श घालवून दिला, असे सांगितले. कुशवाह परिवाराचे आभारही मानले. यावेळी बी.के.सुनीता बहन, अनुपमा बहन, भरत भाई, बी.के.कविता बहन, नाना पाटील सर उपस्थित होते.





