भुसावळ शहरातील प्रांजल पाटील बारावी परीक्षेत बियाणी स्कूलमधून तृतीय


Pranjal Patil from Bhusawal city came third in the 12th examination from Biyani School.भुसावळ (6 मे 2025) : शहरातील बियाणी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्सची विद्यार्थिनी प्रांजल मंगेश पाटील ही बारावी परीक्षेत 89 टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातून तृतीय आली. तिला 600 पैकी एकूण 534 गुण प्राप्त झाले.

ती के.नारखेडे विद्यालयातील हेड क्लर्क मंगेश जनार्दन पाटील आणि सेंट अलॉयसीस शाळेच्या उपशिक्षिका वैशाली मंगेश पाटील यांची प्रांजल ही कन्या आहे. तिने प्राप्त केलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे भुसावळ व भुसावळ परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. तिने प्राप्त केलेल्या या यशात तिचे आई-वडील, शाळेतील शिक्षक आणि तिचे काका नितीन जनार्दन पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रांजलने सांगितले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !