सासुसोबतच अनैतिक संबंध लपवण्यासाठी नराधम पित्याने केली मुलीची हत्या


Father kills daughter to hide immoral relationship with mother-in-law सोलापूर (26 मे 2025) : सासु सोबतच जावयाचे अनैतिक संबंध असल्याची कुणकुण सात वर्षीय लेकीला लागल्याने संतप्त पित्याने मुलीचा गळा आवळत खून केला. ही धक्कादायक घटना सोलापूरात घडली आहे.

जावयाचे आपल्या सासूसोबत अनैतिक संबंध होते. त्या दोघांना चिमुकलीने नको त्या अवस्थेत पाहिले. याची वाच्यता कुठे करू नये, यासाठी निर्दयी बापाने आधी आपल्या मुलीचा गळा आवळून खून केला अन् नंतर तिचा मृतदेह घराशेजारी पुरला. ही चीड आणणारी ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावात घडली. मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थित आढळल्यानंतर गावकर्‍यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती पण शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली. गळा दाबून मुलीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. ओगसिद्ध कोठे असे आरोपी बापाचे नाव असून, मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात 103(1), 238 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !