भारतीय सैन्यात 23 व्या वर्षी लेप्टनंट झालेल्या संकल्प चौधरीचा भुसावळात सत्कार
प्रदेश तेली महासंघ भुसावळ तालुका व भुसावळ तेली समाजातर्फे कार्यक्रमाचे आयोजन
भुसावळ (24 जून 2025) : भारतीय सैन्य दलातील मोठ्या लेफ्टनंट कर्नल पदावर नियुक्त झालेल्या भुसावळातील येथील संकल्प देविदास चौधरी या तरुणाचा प्रदेश तेली महासंघ भुसावळ तालुका व भुसावळ तेली समाजातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करीत सत्कार करण्यता आला. संकल्पची लेफ्टनंटपदी नियुक्ती झाल्याने तेली समाजाच्या शिरपेचात मानचा तुरा रोवला आहे.
जालंदर येथे नियुक्ती
संकल्प हा वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचारी देविदास चौधरी यांचा सुपुत्र आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूल उच्च माध्यमिक शिक्षण डिफेन्स अकॅडमी संभाजीनगर येथून नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) मध्ये सिलेक्शन झाले. नंतर पुणे खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये तीन वर्ष सैन्य दलाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर भारतीय सैन्य दलाच्या डेहराडून येथे एक वर्ष प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता 14 जून 2025 पासून लेफ्टनंट कर्नलपदी जालंधर येथे त्याची नियुक्ती झाली आहे.


यांची सत्कार प्रसंगी उपस्थिती
सत्कार प्रसंगी संकल्पचे वडील देविदास चौधरी यांनी मुलाच्या निवडीमुळे भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना व्यक्त केली. प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ भुसावळ तालुकाध्यक्ष गणेश सोनवणे, कार्याध्यक्ष विजय अण्णा चौधरी, सचिव सुनील चौधरी, कोषाध्यक्ष राकेश रामदास चौधरी, संघटक प्रमुख अनिल विश्वनाथ चौधरी, ज्येष्ठ सदस्य रघुनाथ श्रीधर चौधरी, सुभाष दौलत चौधरी, दत्तू गिरिधर चौधरी, भुसावळ शहर तेली समाजाध्यक्ष संजय श्रावण चौधरी, उपाध्यक्ष सुरेश सोनू चौधरी, सचिव अशोक नामदेव चौधरी, कोषाध्यक्ष सुधाकर श्रावण पाटील, सुनील चौधरी, ऑडिटर गणेश सुरेश सोनवणे, बाळू शांताराम चौधरी, दिलीप विश्राम चौधरी, देविदास रामभाऊ चौधरी, किरण पांडुरंग चौधरी, गोपाळ बळीराम चौधरी, राकेश रामदास चौधरी, विजय देवराम चौधरी, सुभाष दौलत चौधरी, सुनील विश्वनाथ चौधरी, प्रदीप चौधरी, नरेंद्र चौधरी आदींसह समाजबांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक नामदेव चौधरी तर आभार सुनील चौधरी यांनी मानले.






