रीवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष गाडीला मुदतवाढ
भुसावळ (26 जून 2025) : प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने रीवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दर आठवड्याला धावणार्या विशेष गाडीच्या सेवा कालावधीत वाढ केली आहे.
गाडी क्रमांक 02187 रीवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष गाडी 3 जुलै ऐवजी आता 25 सप्टेंबरपर्यंत तर गाडी क्रमांक 02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – रीवा साप्ताहिक विशेष गाडी 4 जुलै ऐवजी 26 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.


विशेष ट्रेनची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाही.






