खान्देशातील प्रवाशांना दिलासा : भुसावळ-दादर रेल्वे गाडीला मुदतवाढ


Relief for passengers in Khandesh: Bhusawal-Dadar train extended भुसावळ (27 जून 2025) :  प्रवाशांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त गर्दीचा भार कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ-दादर व दादर-भुसावळ गाडीला मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे खान्देशातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

09051 दादर-भुसावळ विशेष गाडी आता 30 जुन ऐवजी 29 सप्टेंबर 2025 पर्यंत चालविण्यात येणार आहे. दर सोमवारी सोमवार, बुधवार आणि शनिवारी ही गाडी दादर ते भुसावळ असा प्रवास करणार आहे.



09052 भुसावळ ते दादर विशेष गाडी आता 30 जून एैवजी 29 सप्टेंबर 2025 पर्यंत चालविण्यात येणार आहे. ही गाडी दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणार आहे.

09049 दादर-भुसावळ साप्ताहिक विशेष गाडी आता 26 सप्टेंबरपर्यंत धावणार असून ती दर शुक्रवारी भुसावळ येथून सुटणार आहे.

09050 भुसावळ-दादर साप्ताहिक विशेष गाडी 26 सप्टेंबर 2025 पर्यंत चालविण्यात येणार आहे.

वरील गाड्यांच्या वेळापत्रक, डब्यांची रचना व थांबे यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !